मुख्य बातमी

रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे “महागणपती’’ची प्रतिष्ठापना

सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळातर्फे आरोग्य मंदिर येथे माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

शनिवार, १ फेब्रुवारी ते शुक्रवार, ७ फेब्रुवारी या कालावधीत हा उत्सव साजरा होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. सायंकाळी ८ ते १० या कालावधीत फुणगुस येथील बुवा गौरव पांचाळ आणि साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन कार्यक्रम होईल. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद आणि महिलांचे हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले आहे.

३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका गुरु सौ. प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम आयोजित करण्यात आले आहे, तर रात्री ८ ते ९ या वेळेत श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ केळये यांचे भजन होणार असून बुवा उदय मेस्त्री असणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होईल, तर रात्री ८ ते १० या कालावधीत भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम स्वर आराधना आयोजित करण्यात आला आहे.

५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लांजा येथील श्री. कुर्णेकर महाराज यांचा हरिपाठ होणार असून रात्री ८ ते १० या वेळेत श्री साई सेवा महिला भजन मंडळ वांयगणकरवाडी आंबेशेत यांचे भजन होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद, तर सायंकाळी ७ वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते १० यावेळेत श्रींची आरोग्य मंदिर येथून भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून श्रींचे दर्शनासाठी अवश्य यावे, असे आवाहन रत्नागिरी गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button