मुख्य बातमीराजकीय

नौसीन काझींची सावंतवाडी विधानसभा निरीक्षकपदी नियुक्ती

महाराष्ट्र युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती पत्र 

रत्नागिरी : महाराष्ट्र युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांची सावंतवाडी विधानसभेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्यामार्फत काझी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

राज्यात येत्या महिनाभराच्या कालावधीनंतर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असता. त्यामुळे सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष तयारीला लागलेले असून, सध्या चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कोकणातही निवडणुकीच्या अनुषंगाने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षमार्फत सावंतवाडी विधानसभा (जि. सिंधुदुर्ग) ही महाविकास आघाडीतर्फे ‘राष्ट्रवादी’मार्फत लढवली जाण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने पक्षामध्ये प्रामाणिकपणे तसेच एकनिष्ठेने काम करत असणारे रत्नागिरीचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांची सावंतवाडी विधानसभेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्यामार्फत काझी यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

पक्षाने विश्वास दाखवून माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती मी सार्थपणे पार पाडेन असे, असे श्री. काझी यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले. श्री. काझी यांच्या निवडीने त्यांच्यावर पक्ष तसेच सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button