मुख्य बातमी

कोकणनगर घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

रत्नागिरी : कोकण नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावेळी अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्जबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.

शनिवारी (११ ऑक्टोबर) शहरातील कोकणनगर येथे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संचलन घेण्यात आले होते. या संचलनाच्या वेळी काही अनुचित प्रकार तिथे घडला व त्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगाच्या वेळी पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू माप, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, तारक मयेकर, नितीन लिमये आदी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button