रत्नागिरीतील चार खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
'नवनिर्माण हाय'मधील दोन विद्यार्थिनींचा समावेश

रत्नागिरी : युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप ओम साई मित्र मंडळ सभागृह येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रातील चार खेळाडूंची निवड राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. यामध्ये सई संदेश सुवरे आणि हर्षदा अशोक मोहिते या ‘नवनिर्माण हाय’मधील दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने बीड येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय ज्युनियर वजनी गटातील तायक्वांदो स्पर्धा नुकतीच झाली. यात रत्नागिरी जिल्हा संघाने सहभाग घेतला होता. या संघामध्ये रत्नागिरीतील युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या साधना भावेश गमरे, सई संदेश सुवरे, हर्षदा अशोक मोहिते आणि अमेय भरत पाटील या चार खेळाडूंची निवड राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. या खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष वेंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, संजय सुर्वे यांच्यासाह सर्व पदाधिकारी, तसेच कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालयचे अध्यक्ष अनंतजी आगाशे, युवा मार्शल टायकोंडो ट्रेनिंग सेंटरचे सर्व पदाधिकारी, पालक, प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, सहप्रशिक्षक सौ. शशिरेखा कररा, अमित जाधव, प्रतीक पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्य स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचे (सीबीएससी) मुख्याध्यापक डॉ. अरविंद पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



