मुख्य बातमी

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून आणखी ५ विशेष गाड्या 

रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्या तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

३१ जुलै ला रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश

१) ट्रेन क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (सप्ताहातून दोनदा):

रेल्वे क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – रत्नागिरी विशेष (सप्ताहातून दोनदा) शुक्रवार व शनिवार म्हणजेच ६, ७, १३ आणि १४ सप्टेंबर रात्री ८ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०११३२ रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) (सप्ताहातून दोनदा) विशेष शनिवार व रविवार म्हणजेच ७, ८, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

रेल्वे थांबे : ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड.

संरचना : एकूण २१ एलएचबी डबे = २ टियर एसी – २ डबे, ३ टियर एसी – ६ डबे, स्लीपर – ८ डबे, जनरल – ३ डबे, जनरेटर कार – १, एसएलआर – १.

२) रेल्वे क्रमांक ०१४४७ / ०११४८ पुणे जं. – रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक):

रेल्वे क्रमांक ०१४४७ पुणे जं. – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) शनिवार म्हणजेच ७ आणि १४ सप्टेंबर रात्री १२.२५ वाजता पुणे जं. येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०१४४८ रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार म्हणजेच ८ आणि १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.

रेल्वे थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड.

संरचना : एकूण २२ डबे = २ टियर एसी – १ डबा, ३ टियर एसी – ४ डबे, स्लीपर – ११ डबे, जनरल – ४ डबे, एसएलआर – २.

३) रेल्वे क्रमांक ०१४४४ / ०१४४३ रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक):

गाडीचे क्रमांक ०१४४४ रत्नागिरी – पनवेल विशेष (साप्ताहिक) शनिवार म्हणजेच ७ आणि १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०१४४३ पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) रविवार म्हणजेच ८ आणि १५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० वाजता पनवेल येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

रेल्वे थांबे : संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड़, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा व पेन.

संरचना : एकूण २२ डबे = २ टियर एसी – १ डबा, ३ टियर एसी – ४ डबे, स्लीपर – ११ डबे, जनरल – ४ डबे, एसएलआर – २.

४) ट्रेन क्रमांक ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. – रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक)

रेल्वे क्रमांक ०१४४५ पुणे जं. – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) मंगळवार म्हणजेच १० सप्टेंबर रोजी रात्री १२.२५ वाजता पुणे जं. येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०१४४६ रत्नागिरी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) बुधवार म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.

रेल्वे थांबे : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड.

संरचना : एकूण २० एलएचबी डबे = २ टियर एसी – ३ डबे, ३ टियर एसी – १५ डबे, जनरेटर कार – १, एसएलआर – १.

५) ट्रेन क्रमांक ०१४४२ / ०१४४१ रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक)

रेल्वे क्रमांक ०१४४२ रत्नागिरी – पनवेल विशेष (साप्ताहिक) मंगळवार म्हणजेच १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०१४४१ पनवेल – रत्नागिरी विशेष (साप्ताहिक) बुधवार म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० वाजता पनवेल येथून सुटेल. ही रेल्वे त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे : संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड़, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा व पेन.

संरचना : एकूण २० एलएचबी डबे = २ टियर एसी – ३ डबे, ३ टियर एसी – १५ डबे, जनरेटर कार – १, एसएलआर – १.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button