‘आमदार चषक’ जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा उत्साहात
आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
रत्नागिरी : लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कुणबी सेवा संघ हॉलमध्ये आयोजित आमदार चषक ही जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४ उत्साहात झाली. यात पुरुष एकेरीचे विजेतेपद अभिषेक चव्हाण, पुरुष दुहेरीचे विजेतेपद रियाज अकबरअली आणि अभिषेक चव्हाण, महिला गटाचे विजेतेपद आकांक्षा कदम, कुमार गटाचे विजेतेपद ओम पारकर, किशोर गटाचे विजेतेपद आर्यन राऊत, तर कुमार गटाचे विजेतेपद स्मित कदम यांनी पटकावले.

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व लांजा तालुका कॅरम असोसिएशन यांच्या वतीने झालेल्या या वर्षातील पहिल्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे सदस्य अथर्व साळवी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती दीपाली साळवी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, लांजा तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, स्पर्धा प्रमुख अमित देसाई, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना तालुकासेना प्रसाद माने, कॅरम राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच मंदार दळवी यांच्यासह खेळाडू, प्रेक्षक उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : पुरुष एकेरी उपांत फेरी १- रियाज अकबरअली विजेता विरूद्ध राहुल भस्मे (२५-००,२५-१६), उपांत फेरी २- अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध योगेश कोंडविलकर (२५-१४, २५-००), अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध रियाज अकबरअली (२५-००, २५-१३). पुरुष दुहेरी उपांत फेरी १- रियाज अकबरअली आणि अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध विजय कोंडविलकर (२५-०५, २५-०१), उपांत फेरी २- सागर सावंत आणि मुक्तानंद वरवडेकर विजेता विरूद्ध राहुल भस्मे (१६-२४, २५-१६ ,२५-१६), अंतिम फेरी- रियाज अकबरअली आणि अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध सागर सावंत आणि मुक्तानंद वरवडेकर (२५-१७, २५-००). महिला गट- आकांक्षा कदम विजेता विरूद्ध निधी सप्रे (२५-००, २५-००). कुमार गट– ओम पारकर विजेता विरूद्ध द्रोण हजारे (२५-००, २५-००). किशोर गट– आर्यन राऊत विजेता विरूद्ध सोहम बुटाला (२०-०६, २५-०१). कुमार गट– स्मित कदम विजेता विरुद्ध आयुष चव्हाण (२५-०४, २३-००).

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार नितीन लिमये, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सदस्य राहुल बर्वे, स्पर्धा प्रमुख अमित देसाई, सेक्रेटरी मिलिंद साप्ते, कॅरम राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.




