मुख्य बातमी

आमदार डॉ. राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा उत्साहात

संगमेश्वर : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धा भडकंबा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये ५० हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचा आनंद ५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी लुटला. स्पर्धेचे आयोजन शिवसेना दाभोळे जिल्हा परिषद गटाच्या वतीने करण्यात आले होते.

स्पर्धेच्या प्रारंभी आमदार राजन साळवी यांचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. याचवेळी कोकणमधील प्रसिद्ध अशा मृत्यूमुखी पडलेल्या लाड बंधूच्या सागर बैलाचे पोस्टरला आदरांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आमदार राजन साळवी यांना विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

आपल्या भाषणात डॉ. राजन साळवी यांनी उपस्थिताना वंदन करत आभार मानले व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या हातून कायम सदकार्य घडो असे विचार व्यक्त केले. यानंतर फीत कापून स्पर्धेला प्रारंभ झाला. एकापेक्षा एक अशा सरस बैलजोड्यानी उपस्थित्यांचे डोळयांचे पारणे  फेडले.

यावेळी आमदार राजन साळवी यांच्या समवेत त्यांच्या पत्नी अनुराधा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, जिल्हा परिषद सभापती रजनी चिंगळे, दत्ता घुमे, अजय सावंत, बापू शिंदे, शेखर आकटे, प्रवीण जोयशी, केतन दुधाने, मंगेश दळवी, नानी लोटणकर, प्रियांका जोयशी, रुचिता जाधव, नाना सुर्वे, बबन दुधाने, ओंकार सुर्वे, रावजी धूमक, विलास कांगणे, सचिन अंकुशराव, कमलेश मावळणकर, सुमित वाघधरे, सुरेश कटम, संतोष पांगळे, अनिरुद्ध आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत घाटी गटात द्वारकानाथ माने (प्रथम), विरोबा मानाई ग्रुप (द्वितीय), वैभव लाड (तृतीय), स्वराज गुरव (चतुर्थ), नवलाई देवधे (पाच) त्याचप्रमाणे गावठी गटात सांब कांडकरी ग्रुप (प्रथम), जय संबा पाटगाव (द्वितीय), सुरेश सोलकर (तृतीय), हर्षद साळूंखे (चतुर्थ), आई जुगाई चोरवनणे (पाचवा) क्रमांक पटकवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button