मुख्य बातमी

गुहागरमध्ये अति मुसळधार पाऊस

महामार्गावर पूरजन्य परिस्थिती

गुहागर : तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गुहागर-रत्नागिरी महामार्गावरील आबलोली येथील चंद्रकला पेट्रोल पंपासमोर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. पेट्रोल पंप व आजुबाजूच्या परिसरातून पावसाचे पाणी महामार्गावरून थेट समोरच असणाऱ्या नदीला जाऊन मिळत होते. त्यामुळे महामार्गावर सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती; मात्र काही वेळा नंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली होती. संपूर्ण तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button