मुख्य बातमी
तळेकांटे गावात वृक्षारोपण

संगमेश्वर : तालुक्यातील तळेकांटे येथील गावठाण भागातील रहिवासी तुषार गुरव, पोलीस पाटील अनिल कळंबटे, माजी सरपंच सुरेश गुरव आदी या परिसरातील लोकांनी शाळेच्या परिसरात शिक्षक, विद्यार्थ्यांसमवेत आज (२ जुलै) वृक्षारोपण केले.
पावसाची अनियमितता, बिघडलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता जंगल जगवणे आणि ते वाढविणे हाच उपाय उरला आहे, असा संदेश देत वड, पिंपळ, चिंच, बहावा, सिल्व्हर ओक अशा प्रकारची झाडे या परिसरात लावली गेली.
शाळेतील शिक्षक राजेंद्र जांभळे, सुलभा जाधव, संतोष गुरव, शरद कदम आणि शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.



