मुख्य बातमी

‘नवनिर्माण हाय’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन पतंजली योग समितीच्या योग प्रशिक्षक नीता साने यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या उपक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबरच पालकही सहभागी झाले होते.

योग प्रशिक्षक श्रीमती साने यांनी उपस्थितांकडून सूर्यनमस्कार आणि विविध आसने करून घेतली. यावेळी त्यांनी घेतलेल्या प्रत्येक आसनांचे प्रकार सांगून त्यांचे महत्त्व त्यांनी विशद केले. आपल्या रोजच्या तणावाच्या आयुष्यात योगा करणे उपयुक्त असून त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी तणावविरहित आयुष्य जगण्यासाठी योगा आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच नियमित योगा करावा, असे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांनीही योगाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली.
नवनिर्माण हायमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि विविध आसने केली. त्यांना श्रीमती साने यांच्या सहाय्यक वैष्णवी सावंत आणि हर्षदा दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button