मुख्य बातमी

गोल्डन ९५ फॅमिली ग्रुप’तर्फे गोल्डन मेमरीज कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : मूळचा रत्नागिरीचा परंतु महाराष्ट्र, गोवा अशा दोन्ही ठिकाणी फॅशन फोटोग्राफी, गायन, अभिनय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा, वेगळ्या संकल्पना घेऊन या क्षेत्रात काम करणारा हरहुन्नरी कलाकार कै. संजीव साळवी उर्फ संजू याच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्याचे मित्र, नातलग आणि हितचिंतक यांनी १९ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता सयाजी होम स्टे समोरील नगर परिषद गार्डन येथे ‘गोल्डन मेमरीज.. मित्राच्या आठवणींची सुरेल यात्रा!’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात संजूच्या आठवणी, त्याचे काही खास फोटोग्राफ्स, रत्नागिरीतील गायकांच्या सुमधुर गीतांचा नजराणा त्याच्या जवळच्या माणसांच्या उपस्थितीत उलगडला जाणार आहे. एका मनस्वी कलाकाराला त्याच्या मित्रांनी वाहिलेली ही आदरांजली पहायला, ऐकायला आणि त्यात सामील व्हायला रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोल्डन फॅमिली मित्रमंडळतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button