मुख्य बातमीराजकीय

कोकण पदवीधर मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित यशवंतराव समन्वयकपदी 

रत्नागिरी : सध्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही निवड केली आहे.

मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, तसेच महायुतीमधील मित्रपक्ष, आजी माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख मान्यवर यांच्याशी संपर्क साधून महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा व निवडणूक जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याच्या दृष्टीने समन्वय करावा, अशा प्रकारच्या आशयाचे पत्र अजित यशवंतराव यांना सादर झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित यशवंतराव यांच्यावर ही एक मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button