मुख्य बातमीलोकसभा २०२४

निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतदान सुविधा केंद्र

रत्नागिरी : मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत निवडणूक कर्तव्यावरील इतर कर्मचारी वगळून सर्व पोलीस कर्मचारी, व्हिडिओग्राफर्स, सफाई कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्यावरील इतर कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतदान सुविधा केंद्राची (Facilitation Centre) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील मतदान सुविधा केंद्राचे ठिकाण मध्यवर्ती प्रशासकीय नवीन इमारत, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी येथे ४ ते ६ मे २०२४ या कालावधीत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत मतदान सुविधा केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत निवडणूक कर्तव्यावरील इतर कर्मचारी वगळून सर्व पोलीस कर्मचारी, व्हिडिओग्राफर्स, सफाई कर्मचारी आणि निवडणूक कर्तव्यावरील इतर कर्मचारी यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदार म्हणून निवडणुकीचा हक्क बजावता येण्यासाठी नमुना १२ भरून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान सुविधा केंद्रावर (Facilitation Centre) मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत निवडणूक कर्तव्यावरील इतर कर्मचारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या ६ विधानसभा मतदारसंघामध्ये नियोजित द्वितीय प्रशिक्षणाचे ठिकाणी मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत निवडणूक कर्तव्यावरील इतर कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिकेदवारे मतदानाचा लाभ घेतलेला आहे. ही मतदान सुविधा केंद्रांमध्ये झालेल्या टपाली मतदानाची आकडेवारी ५ हजार ६०४ इतकी असून या मतदारसंघाचे झालेले टपाली मतदान ४ हजार २०९ व इतर लोकसभा मतदारसंघाचे झालेले एकूण टपाली मतदान १ हजार ३९५ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button