Uncategorizedमुख्य बातमीराजकीय

रत्नागिरी शहरात महायुतीच्या प्रचाराला सुरुवात

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ३ आरोग्य मंदिर येथील श्री दत्त मंदिरात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी शहरामध्ये महायुतीतर्फे एकत्रित प्रचार करण्यात येत आहे.
रत्नागिरी शहराच्या १५ प्रभागांमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा महायुतीतील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात केली.
प्रचाराची पत्रके वाटून आणि मतदारांना आवाहन करून जास्तीत जास्त मतदान करण्यास यावे, असे सांगण्यात येत आहे.
प्रारंभी आमदार माने, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, राजेश्वरी शेट्ये, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, उमेश कुळकर्णी, प्रवीण देसाई, शिवसेना विभागप्रमुख रूपेश पेडणेकर, उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर, युवा नेते प्रसाद शेट्ये, पूजा दीपक पवार, दिव्या कामतेकर, तुषार देसाई, कुमारी शिवानी सावंत, प्रसाद बाष्टे, राजू बने यांच्यासह शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button