मुख्य बातमीसाहित्य-कला

वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तब्बल ११ पुस्तके लिहिणाऱ्या सैतवड्याच्या उबेद शेकासनचा सत्कार

रत्नागिरी : तालुक्यातील सैतावडे या छोट्याशा गावात राहणाऱ्या उबेद वसीम शेकासन या १३ वर्षांच्या मुलाने तब्बल ११ पुस्तके लिहिली आहेत. उमेदने लिहिलेल्या “द मिरॅक्युलस मॅन” या पुस्तकाला एका पुरस्कार ही मिळालेला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्द न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सत्कार मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडेचे अध्यक्ष रहीम माद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उबेद शेकासनचे आजोबा, आजी व त्याची आई उपस्थित होते.

उबेद हा इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. त्याला लहानपासूनच लिखाणाची आवड निर्माण झाली. तो सतत काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातूनच त्याने एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल ११ पुस्तके लिहिली आहेत. याविषयी त्याच्याशी संवाद साधल्यानंतर तो म्हणाला, मी माझ्या वडिलांना आयडॉल मानतो आणि माझे एक पुस्तक “द मिरॅक्युलस मॅन” हे माझ्या वडिलांवर आधारित आहे. मी याचे श्रेय पूर्ण माझ्या वडिलांना देतो की त्यांनी मला प्रेरणा दिली आणि सहकार्य केले.

उबेदच्या पालकांनी सांगितले की, आत्ताची मुले ही मोबाईलशिवाय राहूच शकत नाही; पण उबेद हा सतत काही ना काही विचार करत असतो, लिहित असतो. दिवसातून जेमतेम केवळ अर्धा तासच मोबाईलचा वापर करतो. ते ही त्याच्या मनाला वाटले तरच, नाहीतर तो पूर्णपणे मोबाईलपासून लांब राहतो.

 

या सत्कार समारंभाच्या वेळी दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या शाळेतील डॉजबॉल संघातील मुलींचाही सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभासाठी सैतवडे गावातील दोन्ही हायस्कूलच्या मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सत्कार समारंभ यशस्वी करण्याकरिता न्यू हिरा इंग्लिश स्कूल सैतावडेचे सचिव सादिक कपडे व या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंतुले यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button