मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

मिरजोळे येथे आजपासून राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा

रत्नागिरी : मिरजोळे येथील आई कालिका देवी शिमगोत्सवानिमित्त स्व. उत्पल उर्फ भाई पाटील स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष गट निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन १४ ते १६ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी व रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा कालिका मंदिर येथे होईल.
आज (ता. १४) संध्याकाळी ६ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. १५ मार्चला संध्याकाळी ६ वाजता स्पर्धेतील साखळी सामने आणि त्यानंतर साखळी व बाद फेरीतील सामने होतील. १६ मार्चला रात्री ८ वाजता स्पर्धेतील अंतिम सामने होतील. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्काराचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता स्पर्धेचा अंतिम बक्षीस वितरण समारंभ होईल. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास ७७ हजार ७ रुपये, ५५ हजार आणि ७ रुपये आणि २० हजार ७ रुपये आणि प्रत्येकी चषक असे बक्षीस दिले जाईल. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूला १० हजार ७ रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई ५ हजार ७ रुपये व चषक आणि उत्कृष्ट पकड ५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूला ६ हजार रुपयांची ट्रॅव्हलिंग बॅग दिली जाईल.
या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक आई कालिका क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button