
रत्नागिरी २६,
कोकण शिक्षक मतदार संघात आज उच्चांकी मतदान झाले यात रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानात उद्यागमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या निवडणूक बुथवरील प्रत्यक्ष उपस्थितीने मतदार आणि कार्यकर्ते यांच्यात अत्यंत चैतन्याचे वातावरण होते. रत्नागिरी जिल्ह्यात ९४.४१ टक्के असे उच्चांकी मतदानाची नोंद झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९७.४१ टक्के मतांची नोंद झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा हजार मते ह्या निवडणूकीतील विजयाची शिल्पकार ठरविणार असे भाकीत केले जात आहे. या कोकण मतदार संघातील सरासरी ९१.०२ टक्के झालेले उच्चांकी मतदान निवडणूक पुर्वीचे सर्व भाकीते धूळीस मिळवत धक्कादायक निर्णय देतील असा अंदाज याक्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
कोकण मतदार संघात जरी आठ उमेदवार असले तरी खरी लढत तिरंगीच होती. आणि त्यातही अटीतटीची लढत ही विद्यमान आमदार बाळाराम पाटील आणि भाजपचे शिंदे गट पुरस्कृत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यातच मानली जातल. मागील निवडणूकीत बाळाराम पाटील विरोधात म्हात्रे हा सामना रंगला होता. त्यावेळी बाळाराम पाटील यांना ११, ८३७ मते मिळाली होती तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ६८८७ मते मिळाली होती. म्हणजे ४९५० मतांचा फरक होता. गेल्या चार निवडणूकात ह्यावर्षी प्रथमच अशी घटना घडली की कोकणातील सर्वाधिक उत्तम शिक्षक संघटना म्हणून कोकणात संघटन असणारी टीडीएफ ह्या संघटनेने आपला उमेदवार न देता बाळाराम पाटील यांना आपला पाठींबा जाहिर केला. यामुळे बाळाराम पाटील यांना थेट १२०० ते २००० मतांचा फायदा झाला. म्हणजे फरक ६-७ हजार मतांवर गेला.
मात्र त्याचवेळी ज्ञानेश म्हात्रे यांना थेट विद्यमान सत्ताधरी पक्षाचा आश्रय मिळाला. भाजपच्या अधिकृत तिकीटावरच ते निवडणूकीला उभे राहीले. भाजपचा हा पारंपारीक मतदार संघ मानला तरी गेल्या २० वर्षात झालेल्या बदलात शिक्षक मतदारांच्यातील ती कडवटता टिकून राहीली नाही. अनुदानीत विनाअनुदानीत माध्यमातून नवा चेहरा मतदार मोठ्या संख्येने आला. यात भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच या मतदार संघाची जबाबदारी दिली आणि शिंदे गटाचा हा अत्यंत प्रतीष्ठेचा मातदारसंघ झाला. ठाणे पालघर तर मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आणि इकडे रत्नागिरी ना. उदयजी सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतः नारायण राणे यांचा झंझावातील दरारा यामुळे, फक्त रायगडच्या खिंडीत बाळाराम काय तग धरु शकतील असाच माहोल संपूर्ण कोकणात. पुर्वी हा मतदार संघात राजकारणि यांच्या प्रचारसभा भेटी व कॅंम्पेन हे प्रकार नव्हते. ह्यावेळी कार्यकर्त्याचे जथे आणि भल्या मोठ्या गाड्यांच्या ताफ्यानी शाळांच्या पटांगणावरील धुळीचे उसळलेले लोट अजूनही खाली बसलेले नाहीत. त्यातही साम दाम दंड अनुशासन आयूधांचा मनमुराद वापर केल्याच्या चर्चांनी कोकण आसमंत व्यापला आहे.
या निवडूकीतील सर्वाधिक महत्वाची भूमिका आहे. ती शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीची . शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे यापुर्वी दोनवेळा या मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत. त्यांची ४ ते ५ हजार मतांचा कोठा हा ठरलेला आहे. यावेळी नव्या दमाचे आणि शिक्षकांच्या प्रक्षणावर गेली १० वर्षे सतत काम करणारे धनाजी पाटील यांची उमेदवारी हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब होती. प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याला उमेदवारीची संधी मिळाली होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक माहोल त्यांच्यासोबत होता। मात्र रायगड ठाण्यात ते किती मुसंडी मारतील हे महत्वाचे आहे. त्यांचे प्रत्येक मत हे बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पैकी कोणाच्या विजयाचे पारडे कोठे झुकवायचे यासाठी निर्णायक ठरणार आहे. यावेळी शिवसैनिक अत्यंत उत्साह आणि जोषाने या निवडणूकीत उतरला आहे. प्रत्येक शिक्षक मतदान केंद्रापर्यंत जाईल अशी यंत्रणा राबली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या प्रतीष्ठेची ठरलेली ही निवडणूक कोणता निर्णय देईल याची मोठी उत्सूकता आहे.



