मुख्य बातमीराजकीयलोकसभा २०२४

विजयाची हॅटट्रिक मारणार : खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : दिवसभरात संपूर्ण मतदारसंघात फेरफटका मारल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मतदारांचा दिसलेला उत्साह आणि आनंद बघून आपणच विजयाची हॅटट्रिक मारणार असल्याचा विश्वास इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर संध्याकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, “सिंधुदुर्गपासून रत्नागिरीतील लांजा राजापूरपर्यंत अनेक मतदार केंद्रांना मी भेट दिली. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह मी पाहिला. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार मतदारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे मी विजयाची हॅटट्रिक करणारच.”
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदय बने, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे दीपक राऊत, माजी शहरप्रमुख आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे, राजन सुर्वे, युवासेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रसाद सावंत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button