महिला जगतमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे ‘CPD’ एकदिवसीय शिबिर यशस्वी संपन्न.

संगमेश्वर : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग (लोवले, संगमेश्वर) यांच्या वतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट’ (CPD) अंतर्गत एकदिवसीय शैक्षणिक शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संकुलात झालेल्या या शिबिरास जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधील ३३१ नर्सेसनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 या शिबिरासाठी नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे आणि त्यांना जन्मानंतर मिळणारी प्राथमिक काळजी अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

रत्नागिरी जिल्हा स्कूल ऑफ नर्सिंगचे श्री. बिराजदार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून नवजात शिशूंच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपचार पद्धतींवर सखोल भाष्य केले.

याव्यतिरिक्त नर्सिंग क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले :- प्रा. स्नेहल खेराडे व प्रा. अमृता पाल्ये (नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग)प्रा. सुजाता महाडिक (डेरवण नर्सिंग कॉलेज)प्रा. अजित देशपांडे (MES नर्सिंग कॉलेज)प्रा. स्मिता सुर्वे (रत्नागिरी जिल्हा स्कूल ऑफ नर्सिंग)या मान्यवरांनी नवजात बालकांची काळजी, आपत्कालीन नर्सिंग सेवा आणि कौशल्य विकास यावर महत्वपूर्ण माहिती दिली.

“अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे नर्सिंग व्यावसायिकांच्या ज्ञानात भर पडते आणि नवजात शिशूंच्या आरोग्यसेवा अधिक दर्जेदार होण्यास मदत होते,” असे मत सहभागी परिचारिकांनी व्यक्त केले.

संस्थेचे चेअरमन मा.अभिजित हेगशेट्ये आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रज्ञा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या यशस्वी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. नर्सिंग क्षेत्रातून लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button