महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील १२जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५फेब्रुवारीला
७ फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी

मुंबई :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
१६ जानेवारी २१ जानेवारी अर्ज दाखल करणे,
२२ जानेवारी रोजी होणार छाननी,
२७ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल
७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
२५ हजार ४८२ मतदान केंद्र, राहणार असून १२ जिल्हा परिषदेत ४३१ सदस्यांची निवडणूक होणार आहे.



