मुख्य बातमीशैक्षणिक

“नवनिर्माण”तर्फे आयोजित रानभाज्या महोत्सव व रानभाज्या पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

संगमेश्वर : येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे हॉटेल मॅनेजमेंट या विभागाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सव व रानभाज्या पाककृती स्पर्धेला तालुक्यातील बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत स्वयंसिद्धा बचत गट (नावडी) गटाने प्रथम क्रमांक पटकावला. एकता गट (लोवले) यांनी द्वितीय, तर जाखमाता समूह (नावडी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे फायदे पुढील पिढीला कळावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे या हेतूने हा महोत्सव भरविण्यात आला होता. पावसाळ्यात आपल्या आसपासच्या परिसरात रानभाज्या उपलब्ध होत असतात. या सर्व रानभाज्या वेगवेगळ्या चवीच्या तसेच वेगवेगळे औषधी गुणधर्माने युक्त असतात. यातील काही भाज्या आपल्याला माहित असतात मात्र अनेक रानभाज्यांविषयी आपल्याला माहिती नसते. काही वेळा या भाज्या चुकीच्या पद्धतीने बनवल्या जातात त्यामुळे अनेक जण याचा आहारात वापर करताना दिसत नाहीत. नवीन पिढीला रानभाज्यांचे गुणधर्म व त्यांचे संवर्धन यांची प्रेरणा मिळावी या हेतूने हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्माण कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, लोवले गावच्या सरपंच ऋतुजा कदम मॅडम यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून श्री. अमोल वाडकर आणि सौ. प्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नेमण यांनी केले. या महोत्सव आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभागप्रमुख भिकाजीराव बेहरे आणि किचन विभागप्रमुख मितेश पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button