मुख्य बातमी
जिल्हा नियोजन समितीची १५ जुलैला बैठक

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (१५ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी कळविले आहे.



