रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन शनिवार दि. २२नोव्हेंबर २०२५
रत्नागिरी :- मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे पहिल्या २०२५ च्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचा सन्मान नवनिर्माण शिक्षण संस्थेला मिळाला आहे.
शनिवार दि. २२नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ६.०० ते रात्री १०.०० असे एकदिवसीय साहित्य संमेलन जेष्ठ साहित्यिक डॅा. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
खल्वायनच्या उष:काल मैफीलीने संमेलनाचा जागर सुरु होईल. ग्रंथ दिंडीत आधुनिक मराठीचे आद्य कवी केशवसुत, लोकमान्य टिळक, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, स्वामी स्वरुपानंद, कुसुमताई अभ्यंकर, जेष्ठ कवी विं. दा करंदीकर , गज़लकार बद्दीउजमा खावर या साहित्यिकांचे ग्रंथचित्र रथ हे ग्रंथ दिंडी चे आकर्षण असेल. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मराठी भाषा मंत्री रत्नागिरी चे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे हस्ते संपन्न होत आहे.
ट्रान्स जेंडरसाठी अभूतपूर्व कार्य करणाऱ्या रत्ननगरीच्या सुकन्या श्रीगौरी सावंत, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, जेनझीफेम युवा कवी अनंत राऊत, युवा संशोधक डॅा. प्रतिक मुणगेकर , विविध परिसंवाद आणि संगमेश्वरी साज, पहाटे ची खल्वायन उष:काल मैफल हे या संमेलनाची विशेष आकर्षणे आहेत.
नाष्टा, जेवण यांची मोफत सुविधा पुर्ण दिवस साहित्यिक कार्यक्रमाचा रसस्वाद घेण्यात अडथळा आणणार नाहीत. आपला पुर्ण दिवस राखून ठेवा. आणि आपण येत असल्याचे आवर्जून कळवा. हेच आग्रहाचे निमंत्रण
आपला स्नेहांकित अभिजित हेगशेट्ये संयोजन समिती र.जि.साहित्य संमेलन
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा साहित्य संमेलन होत आहेत. रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात हे साहित्य संमेलन आयोजन करण्याचा सन्मान शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवनिर्माण शिक्षण संस्थेला मिळाला आहे. यानिमित्त विविध परिसंवाद, काव्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमाला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
मराठी भाषा आणि साहित्याचा समृद्ध वारसा जपण्याचे, आधुनिक विचारांना दिशा देण्याचे आणि नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा देण्याचे काम या साहित्य संमेलनातून निश्चितच घडेल. या साहित्य समंलनातून नवे विचार, नव्या दिशा, नव्या ऊर्जा साहित्य विश्वाला मिळो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असून तो निश्चितच फलदायी ठरेल असा मला विश्वास वाटतो. रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाला हार्दिक शुभेच्छा!!
उदय सामंत उद्योग व मराठी भाषामंत्री, महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा.



