क्रीडामुख्य बातमी

महिलांसाठी आयोजित सॉफ्टबॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्या उद्घाटन

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आमदार किरण सामंत यांची उपस्थिती

रत्नागिरी : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांसाठी सॉफ्टबॉल टेनिस क्रिकेट स्पर्धा उद्या (२८ फेब्रुवारी) कृषी उत्पन्न बाजार समिती, शांतीनगर येथील शिवरुद्र स्पोर्ट्स क्लब टर्फ विकेट येथे दुपारी १२ वाजता सुरू होत आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, सेक्रेटरी बिपिन बंदरकर आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button