मुख्य बातमी

शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत वाचन पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी/विद्यार्थींनी, स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, दि. भा. झोडगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button