मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

शृंगारतळीमध्ये आमदार भास्कर जाधव आणि राजेश बेंडल एकाच व्यासपीठावर

हस्तांदोलन करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा

गुहागर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत तालुक्यातील पाट पन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भालचंद्र चव्हाण यांच्या शोकसभेनिमित्त आमदार भास्कर जाधव आणि महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या. राजकीय विरोधक असलो तरी कोकणची संस्कृती आहे की एकमेकाला समोर आल्यानंतर हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या.

आम्ही जरी राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असलो तरी कोकणची संस्कृती आम्ही जपतो. म्हणून समोर आल्यानंतर एकमेकांना हस्तांदोलन केले. राजेश बेंडल हे माझे कायमचे दुश्मन नाही. शेवटी निवडणुकीच्या मैदानात आम्ही समोरासमोर आहोत. पण आपण संस्कृती जपतो. मी ह्या भागाचा आमदार असल्यामुळे मनाचा मोठेपणा करून राजेश बेंडल यांना प्रथम हस्तांदोलन केले, असे असे आमदार जाधव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आज (१६ नोव्हेंबर) गुहागरमध्ये येऊन शेवटचा प्रयोग करत असून त्यांना माहिती आहे की त्यांचा हा डाव उलटला आहे; मात्र ते इथे शेवटचा प्रयत्न करत आहेत. या मतदारसंघातून माझा विजय हा निश्चित आहे, असा दावाही जाधव यांनी केला.

राजेश बेंडल म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सभेने गुहागरवासीयांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेने वेगळा संदेश आज मिळणार आहे. त्यामुळे माझा विजय हा निश्चित असून, मुख्यमंत्र्यांची सभा ही माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, असे राजेश बेंडल यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button