मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार )पक्षाच्या वतीने  सरकारच्या फसव्या पॅकेजच्या विरोधात निषेधात्मक “काळी दिवाळी” साजरी करणार. 

रत्नागिरी :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्री.शरदचंद्र पवार साहेबांचे आदेश व प्रदेशाध्यक्ष शशिकांत जी शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धुळपेक करून शेतकऱ्यांना जी फसवी मदत दिलेली आहे त्याचा निषेध म्हणून रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी तर्फे ‘ काळी दिवाळी’ म्हणून साजरी करीत आहोत अशाप्रकारे जिल्हाधिकाऱ्यांकडे निषेध म्हणून निवेदना मार्फत मागणी करताना राज्यात सरसकट कर्जमाफीओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000/-हजार ची मदत जाहीर करावी व ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी आग्रहाची मागणी निवेदनामार्फत करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांसाठी मुद्देशीर कार्यतत्परतेने अन्याय विरोधात आवाज उठवताना पुढे येत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेकडून समाधान व कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश चिटणीस- बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष -बारक्या शेट बने,जिल्हा सरचिटणीस – रणजीत शिर्के , जिल्हाध्यक्ष युवक- नौसीन काझी , शहराध्यक्ष – निलेश भोसले जिल्हाध्यक्ष विद्यार्थी – संकेत कदम , मा. वरिष्ठ नगरसेवक बबन आंबेकर , जिल्हा युवक सरचिटणीस मतीन बावांनी ,अल्पसंख्याक महिला शहराध्यक्ष सौ.फरजाना मस्तान , सनीप गव्हाणकर, आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button