रत्नागिरी नगर परिषदेच्या मतदार याद्या मध्ये घोळ!!
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून घेतली गेली हरकत,

नगरपरिषद मुख्याधिकारी यांना शिवसेनेचे नेते बाळासाहेब माने यांनी दिले निवेदन.
रत्नागिरी : ग्रामीण भागातील मतदाराची शहरी भागात ही नोंद!! कुठे तरी एका ठिकाणीनगर नोंद करण्याची मागणी
एक हजार 32 मतदार हे दुभार आहेत. या बाबत बोलताना बाळासाहेब माने यांनी सांगितले की सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायती नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत.
त्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात त्या त्या ठिकाणी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाने असे म्हटले की त्या मतदाराला या संदर्भात काही आक्षेप असतील ते त्यांनी घ्यावेत.
आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी नगर परिषदेमध्ये या संदर्भातल्या आक्षेप घेण्याकरता आलो आहोत.
त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरांमधील जो नगरपालिका नगर परिषदेतील हद्दीमध्ये त्याची जी प्रारूप यादी तयार झाली आहे त्याच्यामध्ये 64 हजार 768 मतदार असल्याची यादी त्यांनी घोषित केलेली आहे, एकूण 16 प्रभाग प्रत्येक प्रभागा मध्ये दोन नगरसेवक याप्रमाणे 32 नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष अशा प्रकारची ही निवडणूक होणार आहे.
आम्ही छाननी केलेली असता यादीमध्ये एक हजार 32 हे मतदार दुभार आहेत किंवा तीन वेळेला आहेत त्यामुळे त्याचे एके ठिकाणी कुठेतरी नोंद झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आणि जो मतदार वर्षानुवर्ष आपापल्या घरा जवळील वार्डा मध्ये त्याचे नाव नोंदलगेले पाहिजे त्याच बरोबर जे मयत मतदार आहे त्यांची पण नाव वगळली गेली पाहिजेत.



