मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयात  ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  संगमेश्वर :भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय अभिजित हेगशेट्ये यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह परेश पाडगावकर, दिलीप रहाटे, उदय संसारे, कापडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना कदम, डॉ. प्रज्ञा कदम, नवनिर्माण पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक किरण गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात नवनिर्माण महाविद्यालयाच्या नव्या वेबसाइटचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह परेश पाडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळी स्पर्धेचेही उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशप्रेम स्पष्टपणे जाणवत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button