रेशन कार्ड धारकांसाठी “मेरा रेशन 2.0” या एप्लीकेशन मधून घरबसल्या नवीन सदस्याचे नाव जोडता येणार.

रत्नागिरी :- तुमच्या रेशन कार्ड मध्ये तुम्हाला तुमच्या घरातील नव्या सदस्याचे नाव ऍड करायचे असेल तर आता तुम्ही अवघ्या दोन मिनिटात नवीन सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये जोडू शकता. यासाठी सरकारने एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे.
रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडताना सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील केली जात असते. शिवाय सर्वसामान्य नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. पण आता सरकारने ही प्रोसेस फार सोपी केली आहे. कारण की आता घरबसल्या रेशन कार्ड मध्ये नव्या सदस्याचे नाव जोडता येणार आहे.
नव्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन सरकारकडून सुरू करण्यात आलेले रेशन कार्ड किंवा मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.
एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये लॉगिन घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने या ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन घेऊ शकता. लॉगिन करताना तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला टाकावा लागणार आहे.
तुम्ही एप्लीकेशन मध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची डिटेल पाहायला मिळेल. तसेच या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डिटेल्स मॅनेज करण्याचा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला ऍड न्यू मेंबर म्हणजेच नवीन सदस्य जोडा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या नव्या सदस्याची सर्व माहिती दिलेल्या रकान्यात भरावी लागणार आहे. नवीन सदस्याची माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या घरातील नव्या सदस्याचे नाव तुमच्या रेशन कार्डवर लागेल.
दुसरीकडे रेशन कार्ड धारकांना केवायसी ची प्रक्रिया देखील पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे रेशन कार्ड धारक केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.



