मुख्य बातमी

पत्रकारांच्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी व नंदादीप आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ३० पत्रकारांनी शिबिरात नेत्र तपासणी करून घेतली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. यासाठी मराठी पत्रकार परिषदेतर्फे नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच सोमवार दि. ६ जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या सुरुवातीला संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजू यांनी डॉ. निकुंज भट यांचे तर जान्हवी पाटील यांनी डॉ. रश्मी खेडेकर यांच्यासह कर्मचारी वृंदाचे स्वागत केले. मराठी पत्रकार परिषद रत्‍नागिरी कडून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या शिबिरासाठी शहर आणि तालुका परिसरातील सुमारे ३० पत्रकारांनी नेत्र तपासणी करुन घेतली. शिबिर यशस्वी करण्यासाठी नंदादिप आय हॉस्पिटलचे डॉ.निकुंज भट, विशालकुमार, डॉ. रश्मी खेडेकर यांच्यासह कर्मचारीवृंदाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button