मुख्य बातमीशैक्षणिक

नवनिर्माणच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली भात लावणी 

बुरंबी (संगमेश्वर) : नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी बुरंबी येथे पार पडलेल्या भातलावणी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेतला. पावसाच्या सरी ,भात मळ्या मधील चिखल, आधुनिक तंत्रज्ञान , बियाणे आणि भात लावण्याचा अनुभव

या उपक्रमात संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये प्रमुख उपस्थित होते.

या उपक्रमात सुमारे २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भातलावणीपूर्वी विद्यार्थ्यांना भात लावणीची पारंपरिक पद्धत, ट्रॅक्टर चालवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण अशा उपयुक्त बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ कृषी कार्याचा अनुभव मिळालाच नाही, तर आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची झलकही पाहायला मिळाली.

कार्यक्रमात युयुत्सु आर्ते, सिद्धेश सावंत, सागर शिंदे, विराज जाधव, श्यामल घाणेकर, प्रशांत खेडेकर, पृथ्वीराज वाडकर, दीपक भोसले, तसेच प्राध्यापक झेपले, उन्मेश रोडे यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी हातात कुदळ, भातरोपं घेत पाणथळ शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने भातलावणी करत खूप आनंद लुटला. ग्रामीण जीवनशैली अनुभवण्याची ही संधी त्यांच्या अभ्यासक्रमात नवचैतन्य घेऊन आली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला.

संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांना भाताच्या जाती व त्याचे महत्त्व याचे मार्गदर्शन केले. आधुनिक शेती करत असताना यंत्रणेचा कसा वापर करावा तसेच वेगवेगळी भात बियाणे अती पाण्यात व कमी पाण्यात कशी व कुठली केली जातात याचे प्रात्यक्षिक यावेळी त्यांनी दाखविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button