मुख्य बातमी

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरी शहरात जंगी स्वागत 

रत्नागिरी : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते काल (२२ डिसेंबर) प्रथमच रत्नागिरीत आले.

उदय सामंत यांचे रत्नागिरी शहरात आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जल्लोष करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी उदय सामंत यांनी सर्व रत्नागिरीकरांना हात दाखवून अभिवादन केले. मारुती मंदिर येथून निघालेली ही भव्य मिरवणूक जयस्तंभपर्यंत मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button