देश-विदेशमुख्य बातमी

जगात अशांतता असताना, योग शांततेची दिशा दाखवेल’, पंतप्रधान मोदींचा संदेश !

जगात अशांतता असताना, योग शांततेची दिशा दाखवेल’, पंतप्रधान मोदींचा संदेश !

  विशाखापट्टनम :  आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टनम येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी म्हटले की, तणाव, अशांतता आणि अस्थिरतेतून जात असलेल्या जगाला योगातून शांततेती दिशा मिळू शकेल.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, दुर्दैवाने आज संपूर्ण जग तणाव आणि अशांततेतून जात आहे. अनेक देशांत अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवू शकतो. योग असे बटण आहे, जे मानवाला श्वास घेण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि पुन्हा नव्या दमाने पुढे जाण्यासाठी क्षणभर विश्रांती प्राप्त करून देतो.

“आज ११ व्यांदा संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. योगचा साधा अर्थ होतो जोडले जाणे. योगमुळे संपूर्ण विश्वाला जोडले आहे, हे पाहणे सुखद आहे. मी दशकभरापासून योग दिनाच्या यात्रेला पाहतो, तेव्हा खूप काही आठवणी डोळ्यासमोर येतात. संयुक्त राष्ट्रात जेव्हा भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा, असा प्रस्ताव मांडला तेव्हा कमीत कमी वेळात १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. या प्रस्तावासाठी झालेली एकजूट ही काही सामान्य घटना नव्हती. हा फक्त एका प्रस्तावाला समर्थन देण्याचा विषय नव्हता, तर मानवतेसाठी केलेला हा एक सामूहिक प्रयत्न होता”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button