21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील एक कारण म्हणजे 21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. तर दुसरीकडे, भगवान शिव, ज्यांना आदियोगी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी या दिवसापासूनच आपल्या शिष्यांना योगाचे ज्ञान देण्यास सुरुवात केली
योग दिनाचे उद्दिस्ट
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेक लोक शारीरिक आणि मानसिक ताणतणावाशी झुंजत आहेत, अशा परिस्थितीत योग करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे अनेक प्रकारचे आजार रोखता येतात, शरीर सक्रिय राहते आणि ताण कमी होतो. भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, ज्यामध्ये पंतप्रधान स्वतः सहभागी होतात.
भारतात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, दरवर्षी या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये, उद्याने आणि सामुदायिक ठिकाणी योग शिबिरे, कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. लाखो लोक एकत्र योगासने करून जागतिक विक्रम देखील करतात
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 थीम
दरवर्षी योग दिन एका थीमसह साजरा केला जातो. या वर्षीची थीम “एक पृथ्वी, एक आरोग्य” आहे. या थीमच्या माध्यमातून निसर्गाचा आदर करावा. कारण आपले आरोग्य हे पृथ्वी ग्रहाच्या आरोग्याशी जोडलेले आहे. त्यामुळे जर आपण आपल्या ग्रहाचे रक्षण केले नाही तर आपण निरोगी राहू शकत नाही. कारण पृथ्वी वर असलेली हवा, पाणी तसेच आपण खातो ते अन्न या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याची आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.



