मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

आ. शेखर निकम यांच्या मध्यस्थी नंतर शिवणे ग्रामस्थ आणि पालकांचे उपोषण अखेर मागे.

वर्गखोली व रस्त्याच्या कामाला गती मिळणार!

संगमेश्वर : शिवणे ग्रामस्थ आणि पालकांनी गेल्या काही दिवसांपासून वर्गखोली आणि रस्त्याच्या कामांच्या मागणीसाठी सुरु केलेले आंदोलन अखेर मागे घेतले आहे. आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित कामांना गती मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

शिवणे शाळेसाठी एक नवीन इमारत यापूर्वीच मंजूर झालेली आहे. मात्र, वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे दुसऱ्या वर्गखोलीची मागणी करण्यात आली होती. ही मागणीही लवकरच पूर्ण केली जाईल, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले असून, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आमदार निकम यांनी या इमारतीच्या निधीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

शिवणे-नांदळज प्रजिमा 48 अंतर्गत मयुरबाग ग्रामसडक योजनेत शिवणेचा समावेश करण्यात आला असून, तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच याचे कामही सुरु होणार असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले.

उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थ आणि सरपंच पदाधिकारी यांची माजी आमदार आणि मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, शिवसेना (उबाठा गट) चे बोरूरकर, माजी सभापती छोट्या गवाणकर, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी भेट दिली. त्याचबरोबर सरपंच राजू पवार आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या लढ्याला यश मिळाले असून, उपोषण मागे घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button