Uncategorizedमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवा : प्रा सुनील जोपळे

रत्नागिरी : वाचाल तर वाचाल हे आपण सतत ऐकत आलो आहोत.पण खरोखरच वाचनाने व्यक्ती समृद्ध होतो.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा असे आवाहन रत्नागिरीच्या स.रा देसाई अध्यापक महाविद्यालयाचे अध्यापकाचार्य प्रा सुनील जोपळे यांनी केले.ते रत्नागिरी येथील फाटक हायस्कूल येथे माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कला क्रीडा शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणात मार्गदर्शन करत होते ते पुढे म्हणाले की,शाळेची समृद्धता ही शाळेतील वाचनालयात असलेल्या पुस्तकांच्या संख्येवर अवलंबून असते.शैक्षणिक संस्थांनी, शाळांनी विविध प्रकारातील पुस्तके, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध करून द्यायला हवीत.वाचनाने विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा मिळते व संतुलित निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते.आपल्या भारताला समृद्ध प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे.हा सगळा इतिहास,माहिती ही विद्यार्थ्यांना वाचनातूनच कळू शकेल असा विश्वास व्यक्त केला.

वाचन या विषयावर बोलताना प्रा सुनील जोपळे यांनी माझ्याकडे वैयक्तिक १ लाख रुपये किमतीची पुस्तके असल्याचे सांगत एक वेगळा आदर्श शिक्षकांसमोर ठेवला.आपल्या व्यक्तिगत प्रगतीमध्ये डाएट चे माजी प्राचार्य डॉ गजानन पाटील यांचे मोठे श्रेय असल्याचे नमूद केले.

विकसित भारताचे स्वप्न गेली अनेक वर्षे आपण पाहत आहोत.स्वप्न बघता बघता अमृत महोत्सव होऊन गेला.बघता बघता शताब्दी येईल.पण भारताला खऱ्या अर्थाने विकसित करायचं असेल तर मोठी जबाबदारी शिक्षकांची असून,त्यांनी ती समर्थपणे पेलायला हवी असे नमूद केले.

शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये शिक्षक म्हणून आपलीं भूमिका फार महत्वाची आहे.शाळेत शिक्षणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न व्हयला हवेत.

रत्नागिरी येथे सुरू असलेले प्रशिक्षण हे डाएट चे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर,राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे,यांच्या मार्गदर्शनासाठी तर अश्विनी काणे ह्या साधनव्यक्ती म्हणून काम पाहत आहेत. तर प्रभात कोकजे,सागर पोकळे,एस आर जोपळे, मोहन बापट,दिगंबर गवळी,वर्षा घाग,विभा बाणे, सुधीर शिंदे,अनंत जाधव,विष्णू पवार,आदी सुलभक म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button