एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात योग दिवस साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समितीच्या योग प्रशिक्षिका शुभांगी सोळंखी यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कला विभागप्रमुख डॉ. पूजा मोहिते, एनएसएस विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सायली कांबळे, प्रा. तेजस्विता कांबळे उपस्थित होत्या. योग प्रशिक्षिका शुभांगी सोळंखी यांनी योगाचे महत्त्व सांगून उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून प्राणायामसह कपालभाती, चक्रासन, ताडासन अशी आसने करवून घेतली. प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी योगा आणि योग साधनेचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेरा काद्री यांनी केले.



