मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराचे लवकरच सुशोभीकरणाचे!

महसूल,गृह राज्यमंत्री ना.श्री योगेशदादा कदम यांची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट..

ऐतिहासिक वारसा असलेल्या संगमेश्वर कसबा परिसराचा प्राचीन इतिहास समजून घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराचे सुशोभीकरणाचे काम प्रादेशिक पर्यटन अंतर्गत आमदार शेखर निकम यांनी मंजूर केलेले काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचना- ना. योगेश कदम

प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या संगमेश्वर परिसराला गृह राज्यमंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांनी संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे भेट देऊन महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर परिसरातील सरदेसाई वाडा, प्राचीन मंदिरे व प्रसिद्ध करणेश्वर मंदिराला भेट दिली व तेथील संगमेश्वर भागातील शिवप्रेमी व प्रमुख ग्रामस्थ मंडळीकडून परिसराची माहिती समजून घेतली

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार,पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री शेखर निकम यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी ५ कोटींचा निधी प्रादेशिक पर्यटन च्या माध्यमातून मंजुर करून आणला त्या कामाची निविदा प्रोसेस येत्या आठ दिवसात करून काम प्रत्यक्ष चालू करण्याच्या सूचना मंत्री महोदय यांनी दिल्या तसेच येथील सरदेसाई वाड्यामध्ये महाराज वास्तव्यास होते तेथे देखील भेट देऊन त्यासंदर्भातील योग्य त्या सूचना मंत्री महोदय यांनी अधिकारी वर्गाला दिल्या आहेत तसेच संगमेश्वर रेशन चालक मालक संघटनेनी पुरवठा विभागातुन येणाऱ्या अडीअडचणीं संबंधित निवेदन दिले त्या संदर्भात देखील सकारात्मक चर्चा करून संबंधित यंत्रनेला सूचना करण्यात येथील असे आश्वस्त केले.

जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्रसिंह यांनी देखील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट देऊन मंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनाचे येणाऱ्या आठ दिवसात कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाना देण्यात आल्या आहेत.

यावेळी गृहराज्य मंत्री नामदार श्री योगेशदादा कदम यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट व महायुती कसबा जिल्हा परिषद गटाच्या वतीने शाल व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले

यावेळी उपविभागीय अधिकारी श्री जीवन देसाई, प्र.उपविभागीय अधिकारी श्री गाताडे, तहसीलदार सौ अमृता साबळे, गटविकास अधिकारी श्री विनोदकुमार शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राजेंद्र महाडिक, माजी जी प अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मज्जीद नेवरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसबा जिल्हा परिषद गट प्रमुख श्रीराम शिंदे, माजी सभापती सुजित महाडिक, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, भाजप सरचिटणीस राकेश जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री शैलेश चव्हाण,उपअधीक्षक भूमिअभिलेख श्री संतोष भागवत, कसबा सरपंच पूजा लाने,ग्रा. प सदस्यां प्रेरणा साळवी,उद्योजक मनमोहन उर्फ बाबा बेंडके, अकबरकाका दसुरकर, अमोल शिंदे, पोलीस पाटील प्रवीण चव्हाण, शंकर लाने,निकेत चव्हाण,राकेश चव्हाण, प्रसाद पाथरे,वेद चव्हाण,पवन निगडे, प्रमोद गुरव,रोशन शिंदे, संतोष खातू, सचिन चव्हाण, फिरोज नेवरेकर,हनीफ वलेले,महमद दसुरकर,दिपक चव्हाण,श्रीकांत निरूळकर, मंडळ अधिकारी श्री अमर चाळके,तलाठी एस एस जमादार , ग्रामविकास अधिकारी रवींद्र खंडागळे , पोलीस पाटील श्री बोडकर सर्व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button