मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त
समस्त रत्नागिरीकरांनी आज स्वयंस्फूर्तीने तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे

रत्नागिरी : पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतील देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ आज (शनिवार, १७ मे) रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये समस्त रत्नागिरीकरांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
आपली एकता दाखवून देण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांची ही रॅली असून, या रॅलीत सहभागी होण्यासाठी आज सायंकाळी ५.३० वाजता सर्वांनी मारुती मंदिर येथे उपस्थित राहायचे आहे. मारुती मंदिर सर्कलमधील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात होणार आहे. जयस्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण करून रॅलीची सांगता होईल.



