मुख्य बातमी

ई-यंत्रणा उपक्रमाच्याअंतर्गत २६ जानेवारी रोजी ‘ई- वेस्ट कलेक्शन’ मेगा ड्राईव्ह

पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन (पुणे) आणि अनबॉक्स युअर डिझायर (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

रत्नागिरी : ई-यंत्रणा उपक्रमाच्याअंतर्गत पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन (पुणे) आणि रत्नागिरीतील अनबॉक्स युअर डिझायर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये २६ जानेवारी रोजी मेगा ड्राईव्ह होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ई- वेस्ट कलेक्शन केले जाईल. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे. जेणेकरून ई- वेस्ट योग्य ठिकाणी रिसायकलिंगसाठी देता येईल आणि त्यापासून होणारे पर्यावरण प्रदूषण रोखता येईल, अशी माहिती अनबॉक्स युअर डिझायरचे गौरांग आगाशे यांनी आज (१० जानेवारी) पत्रकार परिषदेत दिली.

आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन गेल्या वर्षीपासून अनबॉक्स युअर डिझायर ‘प्लास्टिक कचरा संकलन’ आणि ‘जुने कपडे संकलन’ हे सामाजिक उपक्रम राबवत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अनबॉक्स युअर डिझायरकडून प्लास्टिक कचरा आणि जुने कपडे संकलन केले जाते व ते रिसायकलिंगला दिले जाते. त्याचप्रमाणे आता यावर्षीपासून अनबॉक्स युअर डिझायरतर्फे २६ जानेवारी व त्यानंतर देखील प्लास्टिक कचऱ्यासोबत ई- कचऱ्याचे देखील संकलन केले जाणार आहे.

पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही संस्था गेली १० वर्षे पर्यावरण विषयात पुणे येथे काम करत आहे. ‘कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जास्तीत जास्त लोक सहभागातून शाश्वत विकास’ या मूलभूत गोष्टीवर पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन काम करत आहे. जुन्या कपड्यांपासून नवीन उत्पादने बनवणे आणि त्याची विक्री व्यवस्था उभारून याला ‘परिपूर्णम’ असे नाव दिले आहे.

ई-यंत्रण या उपक्रमांतर्गत ई- वेस्ट म्हणजे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपल्याला आता नको आहेत त्या गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते पूनर्वापरासाठी डोनेट करणे हा या मागचा उद्देश आहे. ग्रीन कन्सल्टन्सी या उपक्रमांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कम्पोस्टिंग करून दिले जाते.

ई-कचऱ्यामध्ये या गोष्टींचा सामावेश असेल :

फ्रीज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कॉम्पुटर, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राईव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हीडिओ कॅमेरा, सीडी/डीव्हीडी प्लेयर, मोबाईल फोन, होम थेटर्स, चार्जर्स, हेडफोन्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग ऑर नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तू.

ई-कचऱ्यामध्ये या वस्तूंचा सामावेश नसेल :

फ्लोरोसंट ट्यूबलाईट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब्स, सीएफएल्स.

पुढे दिलेल्या संकलन केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ई- कचरा गोळा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी २६ जानेवारी रोजी आपल्या जवळच्या केंद्रावर आपल्याकडील ई-कचरा नेऊन द्यावा, असे आवाहन पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायरतर्फे करण्यात आले आहे.

‘ई-यंत्रण’ या ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानांतर्गत संकलन केंद्र म्हणून सहभागी होणारी केंद्र :

अनबॉक्स युअर डिझायर : 8767461499 (नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी),

आगाशे फूडकोर्ट : 9209414199 (संभाजी नगर, रत्नागिरी),

सावंत रोडलाईन्स : 9423297470 (साळवी स्टॉप, रत्नागिरी),

धन्वंतरी मेडिकल्स : 9665055654 (मारुती मंदिर, रत्नागिरी),

अभिजित करंबेळकर : 9421079654 (शांतीनगर, रत्नागिरी),

सुवर्णसूर्य फाउंडेशन : 9699777121 (शेरेनाका, रत्नागिरी),

मानस किराणा स्टोअर : 9011662220 (माळनाका, रत्नागिरी),

डी. के. जोशी सन्स : 9422052613 (जिल्हा परिषद, रत्नागिरी),

आर्यक सोल्युशन्स : 9420907533 (रमेश नगर, रत्नागिरी),

अनिकेत कोनकर : 9423292162 (खेडशी, रत्नागिरी),

हॉटेल सी फॅन्स : 9822290859 (मांडवी, रत्नागिरी),

हर्ष दुडे : 9604214101 (कारवांचीवाडी, रत्नागिरी),

खादाडी कट्टा : 8668201414 (जोशी पाळंद, रत्नागिरी)

चिट चॅट क्लब : 7387066767 (थिबा पॉईंट, रत्नागिरी).

‘ई-यंत्रण’ या ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानांतर्गत सहभागी होणारे स्वयंसेवक : 

गौरांग आगाशे : 9730310799

चिन्मय भागवत : 8888798845

गुरुप्रसाद जोशी : 9552546468

रत्नाकर जोशी : 9422052613

महेंद्र दांडेकर : 7410104433

शरदचंद्र वझे : 9822978033

ऋषिकेश सरपोतदार : 9405338354

नेहा गोखले : 9359863349

आशिष पाटील : 8552032533

अमेय मुळ्ये : 9404330003

विशाल पवार : 9172068619

भाग्यश्री सुर्वे : 7249822776

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button