मुख्य बातमी

‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित वेशभूषा स्पर्धेत कियारा नागवेकर प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरीत गुढी पाडाव्यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी बालकांसाठी कांचन डिजिटलतर्फे ‘गुढी पाडवा बालतारा’ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला बालकांनी व त्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेतून आकर्षक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ५ बालकांना ‘गुढीपाडवा बालतारा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या स्पर्धेचे कौतुक केले.
ही स्पर्धा कुतूहल निर्माण करणारी असल्याचे या वेळी उपस्थित पालकांनी सांगितले. स्पर्धेचे आयोजन ‘कांचन डिजिटल’चे छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांनी केले होते. या स्पर्धेला ‘लिटिल हार्ट प्ले ग्रुप अँड नर्सरी’ या स्कूलच्या प्रमुख रोशनी प्रभात सुर्वे यांनी प्रायोजकत्व दिले होते. स्पर्धेचे परीक्षण कांचन मालगुंडकर, कोमल कुलकर्णी-कळंबटे, अशोक आखाडे, जया डावर, प्रिया मयेकर, श्रावणी मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, आदेश मयेकर, अजिंक्य सनगरे, यश मयेकर या सर्वांनी केले.

प्रथम क्रमांक विजेती कियारा नार्वेकरला बक्षीस देताना उद्योजक प्रसन्न अंबुलकर. शेजारी मान्यवर

स्पर्धेचा निकाल असा : कियारा नागवेकर (वेशभूषा- श्रीराम, पहिला क्रमांक), अनिशा साळवी (वेशभूषा- म्हाळसा, दुसरा), सौम्या आठले (वेशभूषा- झाशीची राणी, तिसरा), वेदांग वझे (वेशभूषा- श्रीराम, चौथा), गोरेश कोकरे (वेशभूषा- श्रीकृष्ण, पाचवा). श्रीरंग कलिये, अनन्या देवस्थळी, देवांशी राणे, पलक कोकरे या सहभागी स्पर्धकांना उत्स्फूर्त पारितोषिक देण्यात आली. विजेत्या बालतारांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. पारितोषिक विरतणप्रसंगी श्री. मालगुंडकर यांनी या नवीन वर्षामध्ये अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे प्रसन्न आंबुलकर, श्रीमती सुर्वे, शैलू बेर्डे, श्री. आयरे यांच्यासह श्री. मालगुंडकर यांची सर्व टीम उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button