मुख्य बातमी

रत्नागिरीतील महत्त्वाच्या मच्छीमार जेटीवरील अतिक्रमणे हटवावीत

दर्यावर्दी हिंदू मच्छीमार संघटनेची मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे मागणी 

रत्नागिरी : रत्नागिरीतील महत्त्वाच्या मच्छीमार जेटीवर ठराविक मांडणी अतिक्रमण करून पारंपरिक मच्छीमाराना व्यवसाय करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अशी अतिक्रमणे हटवाबी अशी मागणी दर्यावर्दी हिंदू मच्छीमार संघटना, रत्नागिरी या पारंपारिक मच्छिमार संघटनेने रत्नागिरीच्या मत्सयव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी निवेदन दिले असून, त्यात म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीतील हिंदू समाजातील पारंपरीक मच्छीमार आहोत. आम्ही पारंपरिक पध्दतीने पकडलेले मासे, माश्यांच्या साठवणुकीसाठी लागणार बर्फ व आदी साहित्यासाठी आमची रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर नेहमी ये-जा सुरू असते. रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटी रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी तसेच नौकेवरील आवश्यक साहित्य ये-जा करण्यासाठी शासनाने बांधलेली आहे. रत्नागिरी मिरकरवाडा जेटी व त्याचे सभोवतालचा परिसर हा तुमच्या कार्यालयाच्या अखत्यारित येतो; मात्र मागील काही वर्षांपासून रत्नागिरी मिरकरवाडा जेटीवर व त्याच्या सभोवतालच्या परिसरावर अनधिकृत बांधकामांना पेव फुटला आहे. रत्नागिरी मिरकरवाडा जेटीच्या आवारात अनेक अनधिकृत पक्क्या बांधकामाच्या शेड, दुकानगाळे बांधण्यात आलेले आहेत तसेच रत्नागिरी मिरकरवाडा जेटीच्या येण्या जाण्याच्या मुख्यमार्गावर ठराविक व्यक्तीकडून मासे विकले जात आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना व आमच्यासारख्या पारंपरिक मच्छीमारांना मिरकरवाडा जेटीचा उपभोग घेण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. तसेच अशाच प्रकारचे अतिक्रमण रत्नागिरीतील राजिवडा, साखरतर यांसारख्या सर्वच जेटींवर होत आहे.

या प्रकणाची गंभीर दखल घेऊन मिरकरवाडा व अन्य जेटीवर असलेली अनधिकृत बांधकामे त्वरीत हटवण्याची कारवाई आपण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button