मुख्य बातमीशैक्षणिक
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी ढोलवादन, पोवाडा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया, तह, अफजल खान वध यासारखे प्रसंग नाटकाद्वारे सादर केले.
त्यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



