खैराची झाडे मोफत देण्याचा निर्णय : उद्योगमंत्री उदय सामंत

संगमेश्वर : कोकणातील सर्वाधिक लागवड असणाऱ्या खैराच्या झाडाला १२ नंबर सूचीमधून वगळले असून ऐन, किंजल हे वृक्ष देखील या विधेकातून दंड देण्याचे वगळण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या रोजगारवाढीसाठी खैराची झाडे मोफत देण्याचा निर्णय डीपीडीसीतून घेण्यात आला असल्याचे राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत उदय सामंत यांनी सांगितले.

शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी त्यांनी वृक्षतोड विधेयकासंदर्भात संवाद साधला.
आपण काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. जनेतची कामं करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद यावेळी मिळाला असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
याप्रसंगी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



