मुख्य बातमी

जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने जेएसडब्ल्यू पोर्ट केल्या १६ मागण्या

रत्नागिरी : जयगड गॅस वायू गळती प्रकरणी माध्यमिक विद्यामंदिर जयगड येथे विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन समिती यांची संयुक्त सभा काल (१८ डिसेंबर) झाली. या प्रकरणाच्या अनुषंगाने जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड या कंपनीकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.

सभेमध्ये खालील मुद्दे मांडण्यात आले.

१) जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकडून मेडिकल रिपोर्ट मागणी करणे.

२) शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा कायम स्वरूपी मेडिक्लेम करणे.

३) भविष्यात उ‌द्भवणा-या सर्व आजारांची जबाबदारी कंपनीने घेणे.

४) शाळेच्या आवारात सुसज्य रुग्णवाहिका व त्याच बरोबर तज्ञ डॉक्टर कायम स्वरुपी उपलब्ध ठेवणे.

५) विद्यार्थी, शिक्षक व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी वेळच्यावेळी करावी.

६) कंपनीने गॅस वाहतूक व गॅस साठवणूक त्वरीत बंद करावी.

७) कंपनीकडून १०० बेडचे सुसज्य हॉस्पीटल तयार करणे.

८) उर्जा हॉस्पीटलमध्ये तिनही शिफ्ट मध्ये तज्ञ डॉक्टर उपस्थित असावेत.

९) डॉक्टर कुंभार यांना उर्जा हॉस्पीटलमधून काढून टाकणे.

१०) उर्जा हॉस्पीटलमध्ये तज्ञ नर्सेस नियुक्त करणे.

११) डॉक्टरांच्या नावाची व वैद्यकिय पदवीची पाटी लिहीलेली असावी.

१२) यापुढे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उदभवणा-या आजारांसाठी सरकारी हॉस्पीटल मध्ये दाखल न करता खाजगी मध्ये दाखल केल्यावर त्याचे वैद्याकिय बिल मिळावे.

१३) दिनांक १२/१२/२०२४ रोजीच्या वायु गळती घटनेशी संबंधीत बाधीत विद्याथ्यांना हॉस्पीटलचा व पालकांचा वैयक्तिक खर्च कंपनीकडून मिळावा.

१४) बाधित विद्यार्थ्यांचे काही पालक, जे.एस.डब्ल्यू. कंपनीमध्ये कर्मचारी असल्यामुळे, ते मुलांसोबत असल्यामुळे गैरहजर दिवसांचाही पगार मिळावा.

१५) बाधित विद्यार्थ्याचे पालक जे इतरत्र काम करत आहेत. त्यांनाही आर्थिक मोबदला मिळावा.

१६) विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहाण्यासाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी.

या मागण्या पालक सभेत करण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यापुढची काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button