राष्ट्रसेवादल रत्नागिरी आयोजित शालेय मुलांचे तिन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबीराचे उद्घाटन आज जिल्ह्यातील राज्यस्तरीय जलतरणपटू महेश मिलके यांच्या उपस्थितीत वृक्षजलार्पणाने झाले.

रत्नागिरी :- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश देणारे पुज्य सानेगुरुजी यांनी मुल्याधिष्ठीत , विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी विचारांची तरुणाई राष्ट्र सेवादलाच्या वैचारिक मुशीतून उभारली. आज तोच वारसा नवनिर्माण पुढे नेत आहे. शैक्षणिक उपक्रमा सोबतच उन्हाळ्याच्या सुटीतील राष्ट्रसेवादलाचे व्यक्तिमत्व विकास शिबीराचे हे दुसरे वर्ष . जिल्ह्यातील मुलांच्या उत्सफुर्त प्रतिसादात २१ ते २३ मार्च असणार आहे.
नवनिर्माणच्या संचालिका सीमा मॅडम यांनी या पुर्ण शिबीराचे नियोजन केले आहे. संपुर्ण शिबीराच्या कार्यक्रमाची जबाबदारी बाबा नदाफ यांची आणि त्यांचे सहकारी चंदन कळके, सागर पाटील , अमित पवार आणि बिश्नी थापा या प्रमुखांकडे आहे.
या शिबिरात मुलांना विविध खेळ , नृत्य प्रकार , लेझीम , झांझ, आणि विविध ॲक्टीवीटी देण्यात येतात , अनेक टास्क पार करायचे असतात, सोबत अनेक गाणी त्याचबरोबर अभ्यासपूर्ण व्याख्याने यांचा समावेश आहे.
3दिवसांचा भरगच्च उपक्रम आणि धम्माल मस्ती नवनिर्माणच्या प्रशस्त भव्य कॅम्पस खर्या अर्थाने व्यक्तिमत्व विकासाला नवी दिशा देणारा आहे असे मनोगत यावेळी अभिजित हेगशेट्ये यांनी व्यक्त केले. अखेरचा दिवस समारोप हा पालकांसाठीचा विशेष दिवस असतो.
उद्घाटन सोहळ्याला प्राचार्य डॅा. संजय गवाळे , प्राचार्य उल्हास सप्रे, गौरी मिलके , प्रा. सुकुमार शिंदे , प्रा. ताराचंद ढोबळे उपस्थित होते.



