महिला जगतमुख्य बातमी
उर्मी ग्रुपतर्फे उत्सव खरेदीचा प्रदर्शन

रत्नागिरी : येथील उर्मी ग्रुपतर्फे ‘उत्सव खरेदीचा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध वस्तू, कपडे, दागिने, खाद्यपदार्थ यांची रेलचेल असणार आहे. मारुती मंदिर येथील महिला मंडळ हॉलमध्ये येत्या १४ व १६ फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. येथे आयोजित करण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारीला सायंकाळी ४ ते ८ आणि १५ व १६ ला सकाळी १० ते रात्री ८ हा खरेदीचा उत्सव सुरू राहणार आहे. नागरिकांना आवर्जून भेट देऊन प्रदर्शनाचा व खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन उर्मी ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.



