मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४
संजय कदम यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची २८ ऑक्टोबरला दापोलीत
सभेची जय्यत तयारी सुरू; तरुणांमध्ये नवचैतन्य

दापोली : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची २८ ऑक्टोबरला दापोली येथे विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार संजय कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. या सभेदरम्यान अनेकांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे. विरोधकांना गाढून आपण ४० हजारांच्या मताधिक्याने निवडवून येणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.



