मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

निःस्वार्थ पणे प्रभाग ५ मध्ये काम करणारा – सौरभ मलुष्टें

 रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्र. ५ मध्ये सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे नाव आहे सौरभ सुरेश मलुष्टे. कोणतेही नगरसेवक पद नसताना, केवळ सामाजिक जाणिवेतून एका युवा उद्योजकाने आपल्या प्रभागासाठी स्वखर्चाने केलेल्या कामांमुळे आज तो घराघरात पोहोचला आहे. याच कामांच्या भक्कम जोरावर सौरभ मलुष्टे हे प्रभाग क्र.५ मधून शिवसेनेकडून (Shiv Sena) निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.

आज प्रभागातील नागरिकांच्या तोंडी सौरभ मलुष्टे यांनी केलेल्या कामांचीच चर्चा आहे. “२४ तास ३6५ दिवस कधीही फोन उचलून नागरिकांची गैरसोय दूर करणारा हक्काचा माणूस” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

पद नसतानाही स्वखर्चातून केलेली प्रमुख कामे

मोफत पाणी टँकर सेवा :दोन वर्षांपूर्वी रत्नागिरीत तीव्र पाणी संकट आले होते. पैसे देऊनही टँकर मिळत नसताना, सौरभ मलुष्टे यांनी सलग अडीच महिने स्वखर्चाने मोफत टँकर सेवा पुरवली. आजही जिथे टंचाई जाणवते, तिथे त्यांचे टँकर मदतीला धावून जातात.

मोफत रिक्षा सेवा : कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांना व्हॅक्सिन सेंटरवर जाण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली.

मोबाईल व्हॅक्सिन व्हॅन : जेव्हा लोक घराबाहेर पडण्यास घाबरत होते, तेव्हा नागरिकांच्या दारापर्यंत लस पोहोचावी यासाठी त्यांनी ‘मोबाईल व्हॅक्सिन व्हॅन’ची व्यवस्था केली.

ज्येष्ठ नागरिकांची काळजी: साळवी स्टॉप – नाचणे रोड येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी स्वखर्चाने हक्काचा ‘कट्टा’ बांधून दिला, जो आज अनेकांसाठी विसाव्याचे ठिकाण बनला आहे.

निराधारांच्या आनंदात सहभाग: ‘माहेर’ संस्थेतील निराधार मुलांना त्यांनी ‘तानाजी’ चित्रपटाचा खास विनामूल्य शो आयोजित करून त्यांच्या आनंदात भर घातली.

देशभक्तीचा जागर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त प्रभागातील १००१ घरांमध्ये स्वतः जाऊन तिरंगा ध्वजाचे वाटप केले.

सांस्कृतिक वसा : प्रभागातील महिलांना सुरक्षित वातावरणात दांडिया खेळता यावा यासाठी भव्य ‘दांडिया महोत्सवाचे’ आयोजन, तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘रांगोळी उत्सवा’ची सुरुवात त्यांनी केली.

चोवीस तास पाणपोई: गेली ४ वर्षे साळवी स्टॉप येथे चोवीस तास विनामूल्य पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू ठेवली आहे.

अपंगाला मदतीचा हात : अपघातात पाय गमावलेल्या एका गरजू व्यक्तीला कृत्रिम पाय बसवून देऊन, त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात दिला.

रक्तदान शिबीर : वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करून अनेक गरजूंना रक्त उपलब्ध करून दिले, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

चिपळूण महापूर : चिपळूणच्या महापुरात ‘वैश्य युवा संघटनेच्या’ माध्यमातून केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवल्या नाहीत, तर स्वतः लोकांची घरे साफ करण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला.

डास प्रतिबंधक फवारणी : प्रभागाच्या आरोग्याची काळजी घेत नियमितपणे डास प्रतिबंधक फवारणी करून घेतली.

प्रभागाच्या विकासासाठी सज्ज             केवळ सामाजिक कार्यावर न थांबता, प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सौरभ मलुष्टे सांगतात. नगरसेवक पद नसताना एवढी कामे करणारा तरुण, पद मिळाल्यावर प्रभागाचा कायापालट करेल, असा विश्वास आज प्रभाग क्र. ५ मधील नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button